Environmental Enforcement: अलिबाग कोळीवाडा परिसरातील कांदळवन क्षेत्रावरील अतिक्रमणाविरोधात वन विभागाच्या कांदळवन अतिक्रमणविरोधी पथकाने २७ मे रोजी कारवाई केली. मात्र, परिसरातील इतर अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून केवळ एका व्यक्तीवरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप पुढे येत असून, वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत..कारवाई झालेले प्रकाश भगत यांनी वन विभागाच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. आमच्याकडून नियमभंग झाला असेल, तर कारवाई व्हायलाच हवी; मात्र त्याच परिसरातील इतर अतिक्रमणांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, तुमच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यामुळे कारवाई करण्यात आली, असे उत्तर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला..Forest Department: वन विभागाकडे ७२७ कोटींच्या हरित संपत्तीची जबाबदारी. स्थानिकांच्या माहितीनुसार, कोळीवाडा परिसरात १० ते १२ ठिकाणी कांदळवन क्षेत्रात भराव टाकून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या २००५ नंतरच्या आदेशानुसार अशा अतिक्रमणांचे तातडीने निर्मूलन करणे आवश्यक असताना निवडक व्यक्तींवरच कारवाई झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे..याप्रकरणी अलिबागचे कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अतिक्रमणांच्या बाबतीत विभागातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे..Fort Conservation: गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी संसदेत आवाज उठवणार : लंके.पुढील कारवाईकडे लक्षएकाच स्वरूपाच्या अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. या परिसरात कांदळवनाची तोड करुन अतिक्रमणे झालेली आहेत. कारवाई न झाल्याने नागरिकांचे लक्ष आता वनविभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे..कारवाई पद्धतीवर प्रश्नचिन्हवन विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरच संशयाची सुई फिरू लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे..वन विभागाने अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित जागांवर पुन्हा कांदळवनांची लागवड करून संवर्धनाची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी ती तातडीने वन विभागाकडे द्यावी.- कुलदीपक पाटकर, कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.