Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : जुलैमध्ये तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहणार? जुलै महिन्यात राज्यातील जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण कसे राहणार ?

Anil Jadhao 

Pune Monsoon News : माॅन्सूनने संपूर्ण देश व्यापला तरी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. त्यातच हवामान विभागाने जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज दिला. मग राज्यात पाऊस कसा असेल? आपल्या जिल्ह्यात जुलै महिन्यात पाऊस कसा पडेल? तापमान कसे असेल? याची माहिती शेतकऱ्यांना महत्वाची असते. शेतकऱ्यांच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिले आहेत.

जुलै महिन्यात राज्यात पावसाच्या अंदाजाविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये लेह, लडाख, पूर्व तामिळनाडू आणि पूर्वोत्तरेतील ७ राज्ये वगळता जुलै महिन्यात सरासरीच्या १०६ टक्क्यापेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही. महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाची शक्यता जाणवते.

तर दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण, माण, खटाव, माळशिरस, पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात १०६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खुपच अधिक आहे.

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यात आणि जिल्ह्यांच्या लगतच्या परिसरात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे श्री. खुळे यांनी सांगितले.

जुलै महिन्यात तापमान कसे राहू शकते? याविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेचे कमाल तापमान हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षा पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

म्हणजे दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता त्यामुळेच जुलै महिन्यात पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे. तर पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे, असेही श्री. खुळे यांनी स्पष्ट केले.

ला-निना स्थिविषयी बोलताना श्री. खुळे यांनी सांगितले की, सध्या एन्सो तटस्थ असून ऑगस्ट महिन्यात ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी.

आतापर्यंत आयओडी धन होता. परंतु पुन्हा तटस्थेकडे झुकत आहे. त्यामुळे जुलैतल्या पावसासाठी अरबी समुद्र व बंगाल उपसागरातील पाणी तापमान समान असणे ही वातावरणीय स्थिती पावसास अटकाव करणारी नाही. ही सुद्धा जुलै महिन्यासाठी जमेचीच बाजू समजावी, असेही श्री. खुळे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT