Maharashtra Weather
Maharashtra Weather Agrowon
हवामान

Monsoon Rain : पुढील आठवडाभर पाऊस कसा राहणार ? मराठवाडा, विदर्भात पावसाचे प्रमाण कसे राहू शकते?

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सून आता संपूर्ण राज्य व्यापले आहे. त्यातच जून महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्यभरात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. मग पुढील आठवडाभरात पावसाचे प्रमाण कसे राहू शकते? पुढील आठवड्यात विभागनिहाय पावसाची स्थिती काया राहू शकते? या प्रश्नांची उत्तर देताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात राज्यात पाऊस चांगला राहू शकतो.

आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. खुळे म्हणाले की, माॅन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र काबिज केला. सह्याद्री घाटमाथ्यावर हलक्या तीव्रतेने का होईना पण माॅन्सूनचा वावर जाणवू लागला आहे. त्यामुळे सध्या जूनच्या ह्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. परंतु माॅन्सूनच्या खंडानंतर महाराष्ट्रात माॅन्सूनचा पाऊस सुरु होणार असल्यामुळे पुन्हा त्याचे स्वरूप सुरवातीचे काही दिवस हे कदाचित पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखेही राहू शकते, असे श्री. खुळे यांनी सांगितले. 

विभागनिहाय पाऊस कसा राहू शकतो? या विषयी बोलताना खुळे यांनी सांगितले की, मुंबईसह कोकणाचा विचार केला तर १८ जूनपासून मुंबईशहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. या आठवड्यातही मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही अजुनही कायम टिकून आहे, असे खुळे यांनी सांगितले. 

विदर्भाचं सांगायचं झालं तर, २० जूनपासून संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली. माॅन्सून बंगालच्या उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळे आता या आठवड्यात सुद्धा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांमध्ये २६ जूनपर्यंत केवळ मध्यम पावसाचीच शक्यता. २७ ते ३० जूनच्या या काळात छत्रपती संभाजीनगर.जिल्हा वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो, असे खुळे यांनी सांगितले. 

मध्य महाराष्ट्राविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की, माॅन्सूनची बंगाल उपसागरीय शाखा सक्रिय झाल्यामुळे माॅन्सूनची अरबी समुद्रीय शाखाही काहीशी उर्जीतावस्थेत आली आहे. त्यामुळे माॅन्सून साधारण एक किलोमीचर उंचीचा सह्याद्री घाट चढून घाट माथ्यावर वावरताना जाणवत आहे. त्यामुळे माॅन्सून खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. पण नाशिक, नगर, पुणे आणि छत्रपती संभाजी नगरच्या काही भागात या आठवड्यात सरासरीपेक्षा  महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण काहीसे कमी असण्याची शक्यता जाणवते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक चांगल्या पावसाची शक्यता कधीपासून आहे? यावर बोलताना श्री खुळे म्हणाले की, भारत विषुववृत्तीय उपसागरीय क्षेत्रात एमजेओच्या सक्रियतेमुळे २९ जून ते ६ जुलै दरम्यानच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यता जाणवते, असाही अंदाज श्री. खुळे यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर; पंचगंगा पात्रा बाहेर, मुंबईत एनडीआरएफची पथके तैनात

Jalgaon ZP : जळगाव जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून प्रशासकराज

Supriya Sule : राज्यासह केंद्रातील ट्रीपल इंजिन सरकार असंवेदनशील; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Rain Update : खानदेशात काही भागांत जोरदार; अनेक मंडलांत तुरळक पाऊस

SCROLL FOR NEXT