Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather : आज राज्यात तापमान कसे होते? राज्यातील किमान तापमानात घट

Weather Update : राज्यावरील पावसाळी वातावरण दूर झाल्यानंतर किमान तापमानातही घट जाणवत आहे. त्यामुळे हवेतील गारवाही जाणवत आहे. राज्यात गारठा हळहळू वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Team Agrowon

Pune News : राज्यावरील पावसाळी वातावरण दूर झाल्यानंतर किमान तापमानातही घट जाणवत आहे. त्यामुळे हवेतील गारवाही जाणवत आहे. राज्यात गारठा हळहळू वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान कायम आहे. काही भागात अद्यापही कमी-अधिक प्रमाणात धुके अनुभवायला मिळत आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम आहेत.

राज्यातील काही भागात आजही ढगाळ वातावरण होते. पण पावसाची नोंद नाही. राज्यातील सर्वच भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. पण बदलत्या वातावरणातील स्थितीमुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

सध्याच्या हवामानाबदद्ल बोलताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकरा खुळे यांनी सांगितले की,  विदर्भ वगळता, कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे २७ अंश सेल्सिअस  तर विदर्भात २५ अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत आहे.

म्हणजेच दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा विदर्भात जवळपास ४ अंश सेल्सिअस तर कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात २ अंश सेल्सिअसने कमी आहे. दुपारच्या तापमानातील ही ठळक व स्पष्ट जाणवणारी मोठी घट आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT