Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023: माॅन्सूनची वाटचाल आज कशी राहीली?

Monsoon Rain Update : काल, सोमवारी (ता.१९) माॅन्सूनने काही भागांमध्ये प्रगती केल्यानंतर आज (ता.२०) पुन्हा मुक्काम केला. माॅन्सूनची सिमा कालच्याच भागात होती.

Team Agrowon

Pune News : काल, सोमवारी (ता.१९) माॅन्सूनने काही भागांमध्ये प्रगती केल्यानंतर आज (ता.२०) पुन्हा मुक्काम केला. माॅन्सूनची सिमा कालच्याच भागात होती. तर बिपरजाॅय चक्रीवादळ निवळल्यानंतर त्याचे रुपांतर आता ठळक कमी दाब क्षेत्रातून आता कमी दाब क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडत आहे.

मागील आठवडाभराचा विचार करता माॅन्सूनने केवळ सोमवारीच प्रगती केली. या आधी मागच्या सोमवारी माॅन्सूनची चाल पाहायला मिळाली. काल काही भागात प्रगीत केल्यानंतर माॅन्सूनने आज एकाच जागेवर मुक्काम केला.

बिपरजाॅय चक्रीवादळ निवळल्यानंतर माॅन्सूनची रखडलेली वाटचाल सोमवारी सुरु झाली होती. माॅन्सूनने काल आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तसचे बंगालच्या उपसागरच्या काही भागांमध्ये प्रगती केली होती. त्याचबरोबर पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंडचा काहीभागात माॅन्सूनने प्रगती केली होती.

माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कर्नाटकचा रायचूर, कावली, कॅनिंग, श्रीनिकेतन, डूमका भागात होती. आजही माॅन्सून याच भागात होता, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचेह हवामान विभागाने म्हटले आहे. माॅन्सून पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण द्वापकल्पचा आणखी काही भाग, ओरिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल तसेच झारखंडचा काही भागात भागात प्रगती करु शकतो.

तसेच बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागात माॅन्सूनची प्रगती होऊ शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

बिपरजाॅय चक्रीवादळाची प्रणाली निवळली आहे. ईशान्य राजस्थान आणि परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याची तीव्रता आता कमी झाली असून कमी दाब क्षेत्रात रुपांतर झाले आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला.

तसेच पूर्व राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेशात अनेक भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर मध्य प्रदेशात २१ ते २४ जून पर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Dam Water Release : 'उजनी'तून 'भीमे'त २० हजाराचा विसर्ग

Plastic Flower Ban : प्लॅस्टिक फूल विक्रीवर शासनाने बंदी घालावी

Urea Shortage : युरीया बनला विक्रेत्यांचीही डोकेदुखी

Fertilizer Smuggling : गोंदियातून मध्य प्रदेशात खतांची तस्करी उघड

Guava Auction : हिमायत बागेतील अतिक्रमण काढल्याच्या परिणामी केंद्राच्या महसुलात वाढ

SCROLL FOR NEXT