Weather Forecast  Agrowon
हवामान

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Weather Forecast : राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली आहे. सूर्य आग ओकत असल्याने सोलापूर आणि अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली आहे. सूर्य आग ओकत असल्याने सोलापूर आणि अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ७) मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह, विदर्भात गारपिटीसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भातील अकोला येथे ४४.४ अंश तापमान नोंदले गेले. चंद्रपूर, वर्धा येथे ४४ अंश, तर ब्रह्मपुरी, गडचिरोली, परभणी, अमरावती, वाशीम आणि नागपूर येथे ४३ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

पूर्व विदर्भापासून तेलंगणा, रायलसिमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात उकाडा कायम असून, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ७) मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ४०.३, धुळे ४२.०, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३८.०, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.८, नाशिक ३८.०, निफाड ३८.५, सांगली ४१.०, सातारा ४०.७, सोलापूर ४४.४, सांताक्रूझ ३४.७, डहाणू ३५.८, रत्नागिरी ३३.५, छत्रपती संभाजीनगर ४१.६, बीड ४२.०, नांदेड ४२.८, परभणी ४३.७, अकोला ४४.४, अमरावती ४३.६, बुलडाणा ३९.६, ब्रह्मपुरी ४३.९, चंद्रपूर ४४.२, गडचिरोली ४३.८, गोंदिया ४१.३, नागपूर ४३.०, वर्धा ४४.०, वाशीम ४३.२, यवतमाळ ४२.५.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) : यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : लातूर, नांदेड, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया.

४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : सोलापूर ४४.४, अकोला ४४.४, चंद्रपूर ४४.२, वर्धा ४४, ब्रह्मपुरी ४३.९, गडचिरोली ४३.८, परभणी ४३.७, अमरावती ४३.६, वाशीम ४३.२, नागपूर ४३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २१ निर्णय; अतिवृष्टीच्या मदतीवरून खडाजंगी

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपातही बँकांचा हात आखडता

Bidri Sugar Factory: 'बिद्री'चा उच्चांकी ३,६१४ रुपये ऊसदर जाहीर, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश, अवघ्या आठवडाभरात दरात बदल

Rabbi Anudan GR: विदर्भासाठी २२६४ कोटींचे रब्बी अनुदान मंजूर; यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक ६३८ कोटी मिळणार

Anjani Project : अंजनी प्रकल्पासह वसंत कारखाना पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT