Vidarbha Rain Agrowon
हवामान

Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा धुमाकूळ; विदर्भात दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

Heavy Rain Alert: विदर्भात जोरदार पावसाची बॅटींग सुरुच आहे. मागील ४ दिवस विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांमध्येही पाणी शिरले. नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भात जोरदार पावसाची बॅटींग सुरुच आहे. मागील ४ दिवस विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांमध्येही पाणी शिरले. नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात मागील ४ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही गावांमध्ये नद्यांचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली. हवामान विभागाने आज अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. 

बुलडाणा, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

उद्या नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

शनिवारी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवड्यातील इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

रविवारपासून विदर्भातही पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसचे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT