Agriculture Subsidy Delays: राज्यातील सूक्ष्म सिंचन संच विक्रेत्यांची वार्षिक नोंदणी अद्याप झालेली नसल्यामुळे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला नोंदणीअभावी शेतकऱ्यांना ठिबक संचाच्या अनुदान वाटपात तांत्रिक अडचणी आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे..सूक्ष्म सिंचन संच निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे अधिकृत वितरक प्रमाणपत्र असले तरी अशा विक्रेत्यांना कृषी विभाग अधिकृत मानत नाही. त्यासाठी कृषी विभागाच्या प्रणालीत नोंदणी करावी लागते. नोंदणी क्रमांक नसल्यास संबंधित विक्रेत्यांकडून विकला गेलेला संच अनुदानास पात्र समजला जात नाही. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नोंदणी करण्यात आली होती. मात्र २०२५-२६ मध्ये सूक्ष्म सिंचन योजनेसाठी फारसे अनुदान वाटप झाले नाही. त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीमुळे राज्यातील ठिबक विक्रेत्यांना वार्षिक नोंदणीत सूट देण्यात आली. २०२६-२७ मध्ये नोंदणीची समस्या पुन्हा उद्भवली आहे..MSP Online Registration: भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू.ठिबक विक्रेत्यांनी कृषी आयुक्तालयाशी पत्रव्यवहार करीत चालू वर्षात वार्षिक नोंदणी प्रक्रियेत पुन्हा सूट मागितली आहे.‘विक्रेता नोंदणीस तातडीने मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे. सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून २०२६-२७ मधील कार्यक्रमासाठी ठिबककरिता पूर्वसंमती पत्रे वाटली जात आहेत. परंतु विक्रेता नोंदणी क्रमांक प्राप्त नसल्यामुळे अनुदान वाटपात अडथळे आलेले आहेत,’ असे विक्रेत्यांनी आयुक्तालयाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे..Chana Farmer Registration: हरभरा नोंदणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद.उत्पादक नोंदणी होताच विक्रेत्यांची नोंदणीकृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की नोंदणी प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचणी आलेल्या नाहीत. राज्यात आधी सूक्ष्म सिंचन संच निर्मिती उद्योगातील उत्पादकांची नोंदणी केली जात असते. .उत्पादक नोंदणीनंतरच विक्रेता नोंदणी केली जाते. दर वर्षी एप्रिल, मे या कालावधीत उत्पादक नोंदणीची प्रक्रिया चालू असते. यंदाही तशी नोंदणी चालू असून ती पूर्ण होताच विक्रेता नोंदणीची प्रक्रिया चालू होईल. यंदा नोंदणी पद्धतीत काही बदल केले जात असून ऑनलाइन प्रणालीमुळे उलट विक्रेत्यांची सोय होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.