Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर वाढला

Monsoon Rain Update : राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाचा जोर वाढला आहे. तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

मध्य महाराष्ट्रात पाऊस

सध्या घाटमाथ्यावर पावसाचा जोरदार सरी कोसळत आहे. ताम्हिणी घाटमाथ्यावर १७० मिलिमीटर पाऊस पडला. तर डुंगरवाडी १४१, शिरगाव, आंबोणे, भिवपुरी, दावडी, भिरा या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. साताऱ्यातील महाबळेश्‍वर मंडलात ११७.५ मिलिमीटर पाऊस पडला असून, लामज ५९.३ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिकमधील उंबरठाणा, सुरगाणा मंडलात ५४, पुणे जिल्ह्यातील कार्ला ६३.५, लोणावळा ५८.३, वेल्हा ९९.८, पानशेत ५४.५, कोल्हापुरातील आंबा येथे ७९.८,

गगनबावडा ५०.८ मिलिमीटर पाऊस झाला. तर नगर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी शिडकावा झाला. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांच्या पूर्व भागात अधूनमधून सरी पडल्या. खानदेशातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. यामुळे मुळशी, पवना, भाटघर, नीरा देवघर, कोयना, वारणा, दूधगंगा अशा काही महत्त्वाच्या धरणांत पाण्याची बऱ्यापैकी आवक सुरू आहे.

मराठवाडा, विदर्भात हलका पाऊस

मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी ऊन आहे. तर तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यामुळे बीडमधील मोहखेड मंडलात २८.३, वाडवणी २७.५, धाराशिवमधील लोहारा २४.८, नांदेडमधील लोहा २१.८, शेवडी येथे ४२.३ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, विदर्भातील गोंदियातील गोरेगाव, कुऱ्हाडी मंडलांत ४०.८, मोहाडी ३४, कवरबांध ५२.३, चंद्रपुरातील गोंडपिंपरी ३६, धाबा ३७.५, गडचिरोलीतील माळेवाड ४०.३, आलापल्ली ४६.०, पेरमिली ३४.८, कमलापूर ६०.५ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील पिके चांगलीच तरारली आहेत.

...येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

चौल १०३.३, पवयंजे, मोराबी १००, महाड, खारवली ११९.५, करंजवडी ११०.३, तुडली ११२.५, रोहा १२३.५, चानेरा १११, कोलाड १२३.३, पोलादपूर, वाकण, खामगाव १००.५, बवरली १०३.३, मेंढा १२३.३, पालगड १०७.५, गुहागर १००.५, आबलोली १२७, हेदवी ११८.८, मंडणगड १२९.८, रत्नागिरी, खेडशी ११५.३, पावस ११०.५, जयगड ११८.५, फसोप ११५.३, कोतवडे १०१.५, मालगुंड १०१.५, पाली ११५.३, देवळे १०६.८, देवरुख १०५.५, माभळ १०३, जैतापूर १०७.५, कुंभवडे १०८.३, नाटे ११०.५, फुंणगुस १०३, भांबेड ९२.८, पुनस ११८.३, साटवली ११०.५, देवगड ११४.३, पाटगाव १२९.८, बापर्डे १२०, श्रावण ११९, आबेरी १०४.५, पोइप १०६, म्हापण १०१.३, वैभववाडी १०८, वालावल १०४.५, तलासरी १३२.५, झरी १०६.३, डहाणू, मालयण १२६.

शनिवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये ः कोकण : मुंब्रा ७३.८, दहिसर, बेलापूर ७१.५, अप्पर कल्याण ७१.५, अंगाव, डिघशी ९०.३, पडघा ६९.८, पोयनाड ८१, सरल ७४.५, चरी ८१.०, रामरज ८१, पनवेल ७४.५, ओवले, कर्नाळा ७६.५, तळोजे ७१.५, कळंब ७५, चौक ७४.५, पाली, आटोने ८९, जांभूळपाडा ९३.८, कसू ९४.५, बिरवडी ९९.८, नाटे ८७.८, माणगाव ७९.५, इंदापूर ८४.३, गोरेगाव ७९.३, लोणेरे ७०.३, निजामपूर ८४.३, नागोठणे ९८.८, कोंडवी ९०, नंदगाव ८९.५, श्रीवर्धन ७८.८, वालवटी ८५, बोरलीपंचटण ८०.५, तळा ८८.३,

दापोली ९०.३, आंजर्ले ९०.३, वाकवली ७०.३, वेळवी ९०.३, खेड ७०.३, शिर्शी ७०, भरणे ८०.८, तळवली ८२, पाटपन्हाळे ७०.५, म्हाप्रळ, देव्हारे ९२.५, कडवी ७३.५, मुरडव ८१.५, माखजन ९०, फणसवणे ९३.३, आंगवली ७६, कोंडगाव ७६, तुळसानी ९७.५, तेर्ये ९३.३, राजापूर ९८.८, कोंडये ८४.५, ओणी ७४.३, लांजा ७४.३, विलवडे ७४.३, मीठबाव ७३.५, मसुरे ८३, आंबोली ७९.५, तळेरे ८४.५, कुडाळ ७७.५, कडावल ८७, कसाल ७७.५, पिंगुळी ८०, येडगाव ७७.३, कडूस ७४.३, कांचड ७३, साइवन ९१.८, कसा ९८, बोयसर ८५.८, विक्रमगड ७७, तलवड ९५.५-

स्रोत कृषी विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT