Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा कायम

Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून सक्रिय असल्याने राज्याचा घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली असून, काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिम बंगाल, बांगलादेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर पासून, जयपूर, ग्वालेर, सिधी, रांची, कॅनिंग ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे.

दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, गुजरात, मध्य प्रदेशातून पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम किनाऱ्यावर पावसाने जोर धरला आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या पावसाने दणका दिल्याने धरणे भरू लागली आहे. काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नद्यांना पूर आला आहे.

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस झाला. ताम्हिणी येथे सर्वाधिक ५५६ मिलिमीटर, शिरगाव येथे ४८४, आंबोणे ४४०, डुंगुरवाडी ४०७, भिरा ४०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लवासा येथेही ४५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी २०० मिलिमीटर, तर अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. उर्वरित राज्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

आज (ता. २६) कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, तसेच पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनासाठी महत्वाचे ४ उपाय; दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास होईल मदत

Farmer Protest: शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (श.प) नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा 

Banana Farming: केळी बागेत काटेकोर सिंचनासह कीड, रोग नियंत्रणावर भर

Cucumber Farming : तंत्रज्ञानाचा वापरातून काकडीचे पीक फायदेशीर

Air Pollution: जनावरांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय

SCROLL FOR NEXT