Maharashtra Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Alert : विदर्भ, कोकणात आज जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update : विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Maharashtra Rainfall Alert : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून, कर्नाल, मेरठ, आझमगड, पटना, देवघर, डायमंड हार्बर ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. उत्तर प्रदेशपासून दक्षिण आसामपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण उत्तर प्रदेशात चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण कर्नाटकपासून तमिळनाडू ते कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उकाड्यात मोठी वाढ

राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरूच आहे. उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. २५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात हवामान ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Subsidy: ‘डीबीटीतील’ पात्र शेतकऱ्यांना ‘कृषी समृद्धी’तून लाभ मिळणार

National Agri Market: आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारणार

Fish Price: सिंधुदुर्गात सुरमईला ७००,पापलेटला ८०० रुपये दर

Brinjal Price: भरीत वांगी दर सरासरी ४५ रुपये किलो

Farm Pond Scheme: शेततळ्यांसाठी शून्य टक्के निधी!

SCROLL FOR NEXT