Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर शक्य

Weather Forcast : विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा

Team Agrowon

Weather News : पुणे : अरबी समुद्रावरून नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय होत असल्याने कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. आज (ता. २२) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधारेचा (ऑरेंज अलर्ट), उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.  

शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात मुसळधार पाऊस कोसळल्याचे दिसून आले. सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे राज्यातील सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.

शुक्रवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात ढगाळ हवामान होते. तुरळक ठिकाणी पावसाला सुरवात झाली होती. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा अद्यापही तापदायक ठरत आहे. तसेच ढगाळ हवामान, पावसाच्या हजेरीने कमाल तापमान ३९ अंशांच्या खाली आले आहे. शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३८.९ अंश तापमानाची नोंद झाली.

मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने आज (ता. २२) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार, रायगड, रत्नागिरी, विदर्भातील बुलडाणा, गडचिरोली, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिमी) ः
कोकण : दोडामार्ग २१०, माथेरान १७०, कणकवली, वैभववाडी प्रत्येकी १६०, कर्जत, चिपळूण प्रत्येकी १४०, आवळेगाव १३०, वाकवली, सावर्डे, ठाणे प्रत्येकी ११०, सावंतवाडी १००, राजापूर, खेड, भिवंडी, मलदे प्रत्येकी ९०, मंडणगड, ८०, कल्याण, उल्हासनगर, कुडाळ प्रत्येकी ७०, दापोली ६०, म्हसळा, लांजा, पालघर, वेंगुर्ला, महाड, हर्णे, सुधागड पाली प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा १७०, महाबळेश्वर, आजरा ७०, कोथरूड, वडगाव मावळ प्रत्येकी ५०, पाटण ४०, कराड, तळेगाव, गडहिंग्लज, पौड, शाहूवाडी प्रत्येकी ३०, चंदगड, सातारा, लोणावळा, वाई, सिंदखेडा, पलूस, गिधाडे, जामखेड, जत, वाळवा, पन्हाळा, कवठे महांकाळ प्रत्येकी २०.

मराठवाडा : नांदेड, कंधार, लोहा प्रत्येकी ३०, पाटोदा, पालम, किनवट, आष्टी प्रत्येकी १०.
.

विदर्भ : नांदगाव काझी ६०, नेर, बाभूळगाव, समुद्रपूर प्रत्येकी ५०, चांदूर रेल्वे, हिंगणघाट, यवतमाळ, दारव्हा प्रत्येकी ४०, यवतमाळ, देवळी, धामणगाव रेल्वे, सेलू, वणी, वर्धा, कोर्पणा, झारी झामणी, कळंब, राळेगाव प्रत्येकी ३०, दिग्रस, अमरावती, हिंगणा, अर्णी, आष्टी, भिवापूर, आर्वी, चंद्रपूर प्रत्येकी २०.

घाटमाथा : कोयना १२०, भिवापूरी ९०, भिरा ८०, वाणगाव, ताम्हिणी प्रत्येकी ७०, खंद, दावडी, ठाकुरवाडी, डुंगरवाडी, अंभोणे प्रत्येकी ६०, शिरगाव ५०.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे :
दोडामार्ग २१०, कणकवली १६०, वैभववाडी १६०, आवळेगाव १३०, सावंतवाडी १०० (जि. सिंधुदुर्ग), माथेरान १७०, कर्जत १४० (जि. रायगड), चिपळूण १४०, वाकवली ११०, सावर्डे ११० (जि. रत्नागिरी), ठाणे ११० (जि. ठाणे), गगनबावडा १७० (जि. कोल्हापूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT