Monsoon Rain  Agrowon
हवामान

Rain Alert : विदर्भात मुसळधारेचा अंदाज; पुढील ५ दिवस राज्यातील बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Rain Update : मराठवाड्यातील अनेक भागातही पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : हवामान विभागाने आजपासूनच विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. उद्या पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असेल. तर मराठवाड्यातील अनेक भागातही पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नगर जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आला. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्याही विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही भागात जोरदार जे अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. अमरावती, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाने दिला. 

सोमवारी राज्यभरात पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

मंगळवारी आणि बुधवारीही विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT