Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

Team Agrowon

Pune News : कोकणात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. सोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत धो-धो पाऊस पडला. ठाणे, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मागील सव्वा महिन्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडूरा मंडलात सर्वाधिक ३४२.५ मिलिमीटर पाऊस पडला.

तसेच मराठवाड्यातही पावसाने बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. तर विदर्भातही बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला आहे. मात्र खानदेशात जोर कमी असून काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

कोकणात अनेक गावांचा संपर्क तुटला

कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. कसाल मंडलात तब्बल ३३५.५ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बांदा, खारेपाटण बाजारपेठेसह जिल्ह्यातील काही बाजारपेठांत पुराचे पाणी शिरल्याने दाणादाण उडाली. मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे.

माणगाव येथील एक वृद्ध नागरिक पुरात वाहून गेला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत धुव्वाधार पाऊस पडला आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली आणि अर्जुना या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. वरची पेठ भागाकडे जाणार रस्ता पाण्याखाली गेल्याने बाजारपेठेतील व्यापारी वर्गाची धावपळ सुरू आहे. शहरातील गणेश घाट आठवडा बाजाराकडील रस्ता पाण्याखाली गेला आहे.

पुराचा धोका ओळखून व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलवला आहे. तसेच शीळ, गोठाणे दोनीवडेकडे जाणारा मार्ग अर्जुना नदीच्या पुराखाली गेला होता. त्यामुळे राजापूर शहराला पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहे.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार :

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. रविवारी सायंकाळी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. यात सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

कोल्हापुरातील गगनबावडा मंडलात सर्वाधिक १४८.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर चंदगड, नारंगवाडी, हेरे मंडलात ११५.३ मिलिमीटर, सोलापूरातील मंगळवेढा मंडलात ९०.० मिलिमीटर पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील वेल्हा मंडलात ८६.३, साताऱ्यातील महाबळेश्‍वर ४५.३, लामज ६६.३ मिलिमीटर पाऊस पडला.

मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला :

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी अधूनमधून तुरळक सरी बरसत होत्या. मात्र, रविवारी बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते अतिजोरदार पाऊस पडला.

तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर अधिक होता. फुलवळ मंडलात १३२.० मिलिमीटर पाऊस पडला. तर परभणीतील पिंपळदरी मंडलात १२१.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना दिलासा मिळाला.

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार :

विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. बुलडाण्यातील बोराखेडी मंडलात १६८.३, हिवखेड १२६.५, जनुमा ११९.५ मिलिमीटर पाऊस पडला. अकोला जिल्ह्यातील शिवनी मंडलात १६३.०, कौलखेड १४६.० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिके तरारली आहेत.

पाऊस दृष्टिक्षेपात...

- मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्यात जोरदार पाऊस.

- डुंगरवाडी, कोयना, ताम्हिणी घाटमाथ्यावरही मुसळधार.

- विहार धरणक्षेत्रात सर्वाधिक ३६४ मिलिमीटर पावसाची नोंद.

- जळगाव, धुळे भागात दीड तास रिपरिप पाऊस, दुपारी उसंत.

- परभणी व परिसरात जोरदार पाऊस सुरू.

येथे पडला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

पोयनाड, चरी, रामरज २५९, चौल २०३.३, चानेरा २४५.५, मुरूड २७१.८, नंदगाव २७९, बवरली २०३.३, म्हसला २७१.३, खामगाव २०१.३, तळा २३१.३, वाकवली २१२.८, खेड २१२.८, देवगड २०५.८, पडेल २६७, शिरगाव २४५.५, बापर्डे २६४.३, मालवण २०९, पेंडूर २२५, मसूरे २३६.८, श्रावण २२४.५, आबेरी २१८, पोइप २९२.८, सावंतवाडी २५३.५, बांदा २६७.०, आबोली २८२.३, वेंगुर्ला २१४.०, शिरोडा २४०.५, वेतोरे २७४.३, कणकवली २२२.८, वागदे २३०.५, कुडाळ २२६, कडावल २४२.८, पिंगुळी २२७.८, आवार २१९.३.

राज्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस (स्रोत ः कृषी विभाग) :

कोकण : ठाणे १९१.८, मुंब्रा १११.८, अलिबाग १८१.३, सरल १४३.३, पवयंजे ८१.३, मोराबी ८१.३, कापरोली, जसइ ९५.५, हमरापूर, वशी ९५.५, बिरवडी १२६.०, इंदापूर ७७.५, गोरेगाव ८०.३, निजामपूर ७७.५, रोहा ९९.३, नागोठणे ६९.३, श्रीवर्धन १३२.३, वालवटी १३९.३, बोरलीपंचटण १२६.०, चिपळूण, खेर्डी १०२.३, मार्गताम्हाणे, रामपूर ८९.५, वहाळ १६०.८, सावर्डे ६५.५, असुर्डे १६०.८, कळकवणे १२४.०, शिरगांव १३१.०, दापोली १७३.०, बुरोंडी ७४.३, दाभोळ ८६.८, आंजर्ले १७३.०, पालगड १३६.५, वेळवी १७३.०, आंबवली १२२.०, कुळवंडी १३४.०, भरणे १७९.८, दाभीळ ११०.०, धामणंद १०२.३, तळवली ७६.०, पाटपन्हाळे ८१.५, आबलोली ८८.८, हेदवी ८७.५, मंडणगड ११७.३, म्हाप्रळ १७९.३, देव्हारे १७९.३, टरवल ८८.८, पाली ७२.३, कडवी १६६.०, मुरडव, माखजन १६०.८, फणसवणे १६६.०, आंगवली १२५.५, कोंडगाव ११४.८, देवळे १३१.०, देवरुख, तुळसानी १०३.०, माभळ १०६.५, तेर्ये १६६.०, राजापूर ११६.८, सौंदळ ९८.०, कोंडये १४९.८, जैतापूर १०८, कुंभवडे १२८.८, नाटे १८०.०, ओणी ११३.५, पाचल १११.५, लांजा ११६.०, भांबेड १३६.५, पुनस १६०.०, साटवली १८०.०, विलवडे १४५.०, मीठबाव १९७.८, पाटगाव १२०.५, आचरा १४०.०, आजगाव १९८.८, म्हापण १६९.३, फोंडा १५३.०, नांदगाव १७०.८, तळेरे १४९.८, वालावल १७९.०, माणगाव १९७.०, वैभववाडी १८९.८, येडगाव १४०.५, भुईबावडा १३९.५, भेडशी १८८.३, वसई १०८.५, मांडवी १०४.०, निर्मल १०४.०, मानिकपूर १०४.०.

मध्य महाराष्ट्र : पंढरपूर ५०.३, भंडीशेगाव ७२.३, भाळवणी ६५.०, तुंगत ७४.५, बोराळे ५१.५, मरवडे ५०.०, मारापूर ६१.३, आंबा ९८.३, राधानगरी ६९.३, कसबा ६०.५, साळवण ५२.८, कडगाव १०७.३,

मराठवाडा : दासखेड ५३.५, घाटनांदूर ६९.३, हनुमंत ५५.८, विडा ५९, नागापूर ५७, सिरसाळा ६१.५, अहमदपूर, खंडाळी ८९.८, आंधोरी ५५.८, लिंबगाव ८२.३, तरोडा ६३, नळेश्वर ५९.३, अदमपूर ६६.३, रामतीर्थ ६४.८,जांब ७२, दिग्रस ६९.३, माळाकोळी १०४, नारंगल ६०, माखणी ९२.५, रानी ७४, बनवस ८८.५, आंबा ११९.३, कुरुंदा ७७.

विदर्भ : घोडप ६१.३, अंजनी ६१.३, कालयाना ८३.३, खामगाव ६५.८, लाखनवाडा ६८.८, काळेगाव १०४.५, अटाळी ६८.८, पळशी ९३.३, अडगाव ६०.३, वझर ६१.८, मोताळा ७२.५, धामनगाव ७८.३, पिंप्री ७४.३, शेलापूर ७४, शेंबा ८१.५, हिवरखेड ६०.८, बाळापूर ११८.८, पारस १११.५, व्याळा ११८.५, उरळ ११०.८, हातरुण ७९.३, अकोला ११०, दहिहांडा ८५.८, कापशी १००.३, उगवा, आगर ६९.५, राजंदा ११९.५, मालेगाव ६५.३, भालर ६६, देवळी ६९.८, पुलगाव ६९, विजय गोपाल ८३.५, मांगळी ९७.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT