Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथा अन् विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज

Rain Forecast : मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २१) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच, मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून अजमेर, दामोह, मंडला, रायपूर, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. तर अरबी समुद्र आणि सौराष्ट्र परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

विदर्भासह, कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील लाखंदूर येथे सर्वाधिक २४१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली होती.

आज (ता. २१) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट आहे. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, जालना, परभणी, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता ओसरणार

बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाब क्षेत्र जमीनीवर आले आहे. शनिवारी सकाळी ही प्रणाली ओडिशाच्या किनारपट्टीय भागात असलेल्या चिलिका तलाव परिसरात होती. पूरी पासून नैर्ऋत्येकडे ४० किलोमीटर तर गोपालपूरपासून ७० किलोमीटर ईशान्य दिशेला या कमी दाबाचे केंद्र होते. ही प्रणाली ओडिशा आणि छत्तीसगड राज्याकडे येत असून, हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सातारा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, जालना, परभणी, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, वाशीम, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना १५ दिवसांची मुदत वाढ; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Revenue Service: महसूल सेवा आता व्हॉट्सअॅपवर

Fertilizer Management: अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम पुरवठ्यासाठी विद्राव्य खतांचा वापर

Rice Export: तांदूळ निर्यात वाढवण्यासाठी छत्तीसगड सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Jijau Jayanti: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघातर्फे विविध कार्यक्रम

SCROLL FOR NEXT