Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : विदर्भ, उत्तर महराष्ट्रात जोरदार तर कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार बरसण्याचा अंदाज

Monsoon Rain Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. १६) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज कायम असून, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, दामोह, पेंद्रारोड, संबलपूर, पूरी, कमी दाबाचे केंद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय झाले आहे. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोर कायम होता. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

रत्नागिरीतील चिपळूण येथे उच्चांकी २४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर खेड, मंडणगड, वाकवली येथे २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

आज (ता. १६) पावसाला पोषक हवामान असल्याने कोकणातील रायगडमध्ये मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. तर ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि विजांसह हलक्या ते जोरदार सरींचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

सोमवारी (ता. १५) बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या कमी दाब क्षेत्रापाठोपाठ शक्रवारपर्यंत (ता. १९) पुन्हा नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, अकोला, वाशीम.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

US Import Duty: भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तानवर शुल्क कमी

NAFED Onion Procurement: नाफेडचा कांदा खरेदीत ‘एमएसपी’ दाव्याचा संतापजनक प्रकार

Pune Dams: जिल्ह्यातील १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग

SCROLL FOR NEXT