Weather Agrowon
हवामान

Weather Update : ऊन ५ दिवसांत आणखी वाढणार; अकोल्यातील तापमान मार्चमध्येच ४१ अंशावर

Maharashtra Weather : राज्यात उन्हाची ताप चांगलीच वाढत आहे. तापमान अनेक ठिकाणी ३९ अंशाच्या पुढे सरकले. तर अकोल्यात ४१ अंश तापमानाची नोंद झाली होती.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात उन्हाची ताप चांगलीच वाढत आहे. तापमान अनेक ठिकाणी ३९ अंशाच्या पुढे सरकले. तर अकोल्यात ४१ अंश तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील तापमान पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये आणखी २ ते ४ अंशाने वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान आता ३६ अंशाच्या पुढे गेले. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अकोल्यासह जेऊल, मालेगाव, परभणी आणि सोलापूर येथे कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला.  तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भ, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान आहेत. तर उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, दुपारच्या वेळी झळा असह्य होत उकाड्यात वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Conservation: माझ्या गोदावरीला श्वास घेऊ द्या...

Farmers Protest: ...अन्यथा आंदोलनाची पुनरावृत्ती होईल

Fruit Crop Insurance: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

Sugarcane Cultivation: ऊस लागवड, व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Agriculture Department Corruption: आठ हजारांची लाच घेणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT