Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Summer Heat : सूर्य पुन्हा तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तुरळक ठिकाणी वादळी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अमोल कुटे

Pune News : सूर्य पुन्हा तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तुरळक ठिकाणी वादळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २८) कोकणात उष्ण लाटेचा इशारा, तर मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. आज (ता. २८) बीड, धाराशीव, लातूरसह विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात वाढ झाल्याने ब्रह्मपूरी, वर्धा, वाशीम, परभणी येथे पारा ४२ अंशांवर पोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार आहे. आज (ता. २८) मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहणार आहे.

शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४०.३, धुळे ४१.५, जळगाव ४०.६, कोल्हापूर ३८.५, महाबळेश्वर ३२.५, मालेगाव ४१.०, नाशिक ३७.६, निफाड ३७.६, सांगली ३९.६, सातारा ३८.२, सोलापूर ४१.२, सांताक्रूझ ३५.५, डहाणू ३३.९, रत्नागिरी ३३.२,

छत्रपती संभाजीनगर ३९.६, बीड ४१.८, नांदेड ४१.२, परभणी ४२.२, अकोला ४१.९, अमरावती ४०.४, बुलढाणा ४०.५, ब्रह्मपूरी ४२.७, चंद्रपूर ४३.६, गडचिरोली ४१.०, गोंदिया ३५.४, नागपूर ३७.०, वर्धा ४२.५, वाशीम ४२.४, यवतमाळ ४१.२.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

चंद्रपूर ४३.६, ब्रह्मपूरी ४२.७, वर्धा ४२.५, वाशीम ४२.४, परभणी ४२.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT