Water Scarcity : यवतमाळ पावसाच्या दीर्घ खंडासोबत गेल्या आठवडाभरातील वाढलेल्या तापमानाचा खरीप पिकांना फटका बसला आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन पिके वाळत असून, अनेक ठिकाणी शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत. कपाशीची वाढही खुंटली असून, कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर उत्पादनाचे मोठे संकट उभे राहिले आहे..आर्णी तालुक्यात सुरुवातीला सोयाबीनची उगवण आणि वाढ चांगली झाली होती. त्यामुळे उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, शेंगा लागण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर झाला आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे वाळत आहेत. काही ठिकाणी शेंगा लागल्या असल्या तरी त्यामध्ये दाणे अपुरे आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे..Rainfall Deficit: सोयाबीन सलाइनवर; कपाशीची वाढ खुंटली.सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठ्या क्षेत्रावरील पिकांना पुरेसे पाणी देणे शक्य होत नसल्याने सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या निर्णायक अवस्थेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाअभावी पाते-फुले गळण्याचे प्रमाणही वाढले आहे..Rainfall Deficit: पावसाअभावी खरिपातील पिकांनी टाकल्या माना.कपाशीची वाढ खुंटलीतालुक्यातील कोपरा परिसरातील कोरडवाहू शेतांमध्ये कपाशीची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी कपाशीची उंची अवघी एक ते दीड फूट आहे. पावसाअभावी झाडांची वाढ खुंटल्याने पाते-फुले आणि पुढील बोंडधारणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या उत्पादनाचे गणितही बिघडले आहे..प्रत्यक्ष पाहणीची मागणीपिकांची स्थिती शेतशिवारात स्पष्ट दिसत असताना प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बाधित क्षेत्र निश्चित करून शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत द्यावी, अशीदेखील शेतकऱ्यांची मागणी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.