Kharif Crop Loss : वर्धा जिल्ह्यातील नऊ महसूल मंडलांत सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने कोरडवाहू सोयाबीन व कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या उत्पादनात १५ ते ३०, तर कापसात १० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे..आर्वी, विरूळ, देवळी, पुलगाव, सेलू, झडशी, हिंगणघाट, वाघोली व तळेगाव (टा.) या नऊ महसूल मंडलांत सलग २१ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला. आष्टी, आंजी, कन्नमवार ग्राम, ठाणेगाव, खरांगणा व रोहणा या सहा मंडलांत १८ ते २० दिवसांचा खंड पडला. हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली, कुटकी, वडनेर, वाघोली व हिंगणघाट या पाच मंडलांत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ६ हजार ५५५ हेक्टर असून, यंदा ४ लाख १९ हजार ५७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख २५ हजार ६५५ हेक्टर असून, १ लाख १९ हजार ७३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे..Rainfall Deficit: सोयाबीन सलाइनवर; कपाशीची वाढ खुंटली.कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील शास्त्रज्ञ तसेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पाहणीत सोयाबीन फुलोरा ते शेंगा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याचे आढळले. पावसाच्या खंडामुळे फूलधारणा कमी होऊन शेंगा भरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे उत्पादनात १५ ते ३० टक्के घट, म्हणजेच हेक्टरी २.५ ते ४.५ क्विंटलपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.कापसाचे सरासरी क्षेत्र २ लाख १८ हजार ६११ हेक्टर असून, यंदा २ लाख ३२ हजार ३५३ हेक्टरवर लागवड झाली आहे. कोरडवाहू व हलक्या जमिनीतील कापसाची पाण्याअभावी वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पातेगळ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात १० ते २५ टक्के घट, म्हणजेच हेक्टरी १.५ ते ४ क्विंटलपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. सध्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीखाली आहे..Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका.पावसाची मंडलेआर्वी, विरूळ, देवळी, पुलगाव, सेलू, झडशी, हिंगणघाट, वाघोली व तळेगाव (टा.) या नऊ मंडलांत सलग २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला. आष्टी, आंजी, कन्नमवार ग्राम, ठाणेगाव, खरांगणा व रोहणा या सहा मंडलांत १८ ते २० दिवसांचा खंड नोंदविण्यात आला. हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली, कुटकी, वडनेर, वाघोली व हिंगणघाट या पाच मंडलांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे..पावसाने काहीसा दिलासा१० सप्टेंबरपूर्वीचा दीर्घ पावसाचा खंड आणि कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन व कापसाच्या उत्पादनावर झालेला परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. तूर सध्या शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.