Heat Wave  Agrowon
हवामान

Heat Wave : विदर्भावर सूर्याचा प्रकोप

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनचे आगमन तोंडावर आले असतानाच देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे. विदर्भातही सूर्याचा प्रकोप कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २९) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात उन्हाचा चटका कायम असल्याने मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली. ब्रह्मपुरी येथे हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश तापमान नोंदले गेले आहे. तेथे २६ मे २०१० रोजी आतापर्यंतच्या उच्चांकी ४८.३ अंश तापमानाची नोंद झाली होती.

नागपूर, वर्धा, अमरावती येथे तापमान ४५ अंशांपार पोहोचले. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पश्‍चिमेकडील वारे आणि अरबी समुद्रावरील बाष्पामुळे ढगाळ हवामान झाल्याने कोकण मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे.

आज (ता. २९) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाट येण्याचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका-कमी अधिक होण्याची शक्यता आहे.

कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘रेमल’ तीव्र चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर ओसरून गेले आहे. मंगळवारी (ता. २८) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते.

मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.९, धुळे ४१, जळगाव ४२, कोल्हापूर ३०, महाबळेश्‍वर २२, मालेगाव ४१.८, नाशिक ३३.३, निफाड ३४.३, सांगली ३०.४, सातारा २८.६, सोलापूर ३४.८, सांताक्रूझ ३४.६, डहाणू ३५, रत्नागिरी ३२.७,

छत्रपती संभाजीनगर ३७.४, नांदेड ४०.८, परभणी ४१.२, अकोला ४२.२, अमरावती ४५, भंडारा ४४.५, बुलडाणा ३९.४, ब्रह्मपुरी ४७.१, चंद्रपूर ४४.८, गडचिरोली ४४.८, गोंदिया ४४.५, नागपूर ४५.६, वर्धा ४५, वाशीम ४१.२, यवतमाळ ४२.५.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अकोला, वर्धा, नागपूर चंद्रपूर.

४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ४७.१, नागपूर ४५.६, वर्धा ४५, अमरावती ४५, चंद्रपूर ४४.८, गडचिरोली ४४.८, गोंदिया ४४.५, भंडारा ४४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT