Rain Forecast Agrowon
हवामान

Weather Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात गारपिटीचा इशारा वादळी पावसाचाही अंदाज; उन्हाचा चटका वाढला

Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Pune News : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली असतानाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे कमाल तापमान ३८.२ अंशांवर पोचले आहे. यातच आज (ता. २) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्याने रब्बी पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा चटका, उकाडा तापदायक ठरू लागला आहे. शुक्रवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव पाठोपाठ रत्नागिरी येथे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव, सोलापूर, सांताक्रुझ, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार गेला आहे.

शुक्रवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३६.० (२०.९), धुळे ३५.० (१४.५), जळगाव ३७.२ (१८.१), कोल्हापूर ३५.१ (२१.७), महाबळेश्वर २९.३ (१९.०), मालेगाव ३८.२ (२२.४), नाशिक ३६.४ (१९.४), निफाड ३४.६ (१५.५), सांगली ३५.७ (२१.७), सातारा ३६.३ (२१.२), सोलापूर ३७.८ (२४.४), सांताक्रूझ ३७.२ (२५.५), डहाणू ३२.७ (२१.६), रत्नागिरी ३८.० (२३.२), छत्रपती संभाजीनगर ३४.८ (१८.२), नांदेड ३५.६ (२१.८), परभणी ३७.० (२०.१), अकोला ३६.९ (२०.५), अमरावती ३५.६ (१९.४), बुलडाणा ३५.० (२२.५), चंद्रपूर ३३.६ (१८.२), गडचिरोली ३४.० (१८.४), गोंदिया ३३.७ (१८.४), नागपूर ३४.६ (१९.०), वर्धा ३६.१(१९.६), वाशीम ३७.२ (१९.२), यवतमाळ ३७.० (२०.५).

कमी दाबाचा पट्टा निवळला

उत्तर केरळपासून ते कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मात्र राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, सायंकाळनंतर पाऊस पडत आहे. आज (ता. २) उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :
जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
धुळे, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

Fisheries Crisis : तलाव आटल्याने मत्स्य संस्थांवर आर्थिक संकट

SCROLL FOR NEXT