Monsoon Rain Agrowon
हवामान

Weather Forecast : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर शक्य

Monsoon Rain Update : तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल अडखळली असली तरी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १९) कोकण आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकमधील हर्सूल येथे ७७ आणि रत्नागिरीतील खेड येथे ७१ मिलीमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टीची नोंद झाली. विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही.

पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार असून, मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.९ अंश तापमानाची नोंद झाली. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे पारा ४० अंशांपार आहे.

आज (ता. १९) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनची प्रगती जैसे थे

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. बुधवारी (ता. १२) विदर्भात वाटचाल करताना अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल जैसे थे असून, मंगळवारी (ता. १८) मॉन्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही.

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

पालघर : वाडा ३२,

रायगड : महाड ३१, पेण ५०.

रत्नागिरी : चिपळूण ३५, गुहागर ३८, खेड ७१, सावर्डे ३३.

मध्य महाराष्ट्र :

नगर : जामखेड ३०.

धुळे : धुळे ३२, गिधाडे ४४, सिंदखेडा ३२,

जळगाव : अंमळनेर ३९, भाडगाव ४०, पाचोरा ६२.

नाशिक : दिंडोरी ४९, गिरणा धरण ५०, हर्सूल ७७, वणी ३२.

सांगली : संख ३०.

सातारा : वाई ३४.

मराठवाडा :

धाराशिव : तुळजापूर ४३.

नांदेड : किनवट २८.

विदर्भ :

चंद्रपूर : जेवती ३१, कोर्पणा ६४,

नागपूर : काटोल ५३, नरखेड २४.

यवतमाळ : घाटंजी २४, झारी झामणी ६४.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor GPS : ट्रॅक्टर ट्राल्यांना जीपीएस, ब्लॅक बॉक्स बसवण्याला विरोध

Ujani Dam Capacity : उजनी धरण १०० टक्के भरले

Reshim Sheti : ऐन चंणचणीच्या काळात रेशीमशेतीचा हातभार

New Mahabaleshwar Project : नवीन महाबळेश्‍वर प्रकल्पामुळे ‘सह्याद्री’चा धोका वाढणार

PDKV Akola : इन्स्टिट्यूशनल फेलो पुरस्काराने ‘पंदेकृवि’चा झाला सन्मान

SCROLL FOR NEXT