Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Latest Rain Forecast : राज्यात पावसाच्या दडीने उन्हाचा चटका तापदायक आहे. मॉन्सूनमध्ये मोठा खंड पडल्याने अनेक भागात पावसाची प्रतिक्षा आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात पावसाच्या दडीने उन्हाचा चटका तापदायक आहे. मॉन्सूनमध्ये मोठा खंड पडल्याने अनेक भागात पावसाची प्रतिक्षा आहे. आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक पासून कोमोरीन भागापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उत्तर मध्य प्रदेशमध्ये समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यात ढगाळ हवामानासह, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे.

उकाड्याने अंगाची लाही लाही होत आहे. कोकणासह राज्यात तुरळक ठिकाणी एखादं दुसरी सर सुखावून जात आहे. आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, विजांसह पावसाची शक्यता आहे.

उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाची शक्यता :

रत्नागिरी, रायगड, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT