Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

Maharashtra Winter Weather Forecast : राज्यातील उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. निफाड येथे किमान तापमानाचा पारा १०.५ अंशांवर आहे. आजपासून (ता. २३) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आग्नेय अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. २२) हरियानातील हिस्सार आणि राजस्थानातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातही गारठा वाढल्याने शुक्रवारी (ता. २२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.५ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आले आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी ३४.७ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २३) किमान तापमानात चढ-उतार होत, राज्याच्या उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे २९.८ (१२.६), अहिल्यानगर २९.२ (१२.३), धुळे (१३), जळगाव २९.८ (१३.२), कोल्हापूर २९.६ (१७.३), महाबळेश्‍वर २६.१ (१४.०), मालेगाव २६.८ (१४.२), नाशिक २८.८ (१२.४), निफाड २७.५ (१०.५), सांगली ३०.२ (१५.५), सातारा ३०.४ (१३.७), सोलापूर ३१.६ (१७.४), सांताक्रूझ ३३.६ (१८.९)

डहाणू ३२.४ (१८.९), रत्नागिरी ३४.७ (१९.६), छत्रपती संभाजीनगर २९ (१४.२), धाराशिव (१५.५), नांदेड (१४.६), परभणी २९.९ (१५), परभणी कृषी विद्यापीठ २९.२ (११.७), अकोला ३०.७ (१६.१), अमरावती ३०.४ (१६.७), बुलडाणा २७.६ (१५.२), ब्रह्मपुरी ३१.१ (१३.९), चंद्रपूर २८.८ (१५.२), गडचिरोली २८.४ (१३), गोंदिया २८.१ (१२.८), नागपूर २९.१ (१५.२), वर्धा २९ (१५.५), वाशीम २९.२, यवतमाळ २९.५.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, या प्रणालीच्या प्रभावामुळे आज (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

MSP Committee : हमीभाव समितीच्या तीन वर्षांत सहा बैठका

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

SCROLL FOR NEXT