Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : लहरी वातावरणामुळे बोर्डीतील शेतकरी चिंतेत

वातावरणात प्रचंड उष्णता, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस सुरू झाल्यामुळे आंबा, चिकू, मिरची उत्पादकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Agrowon

बोर्डी, जि. रायगड : परिसरात बुधवारी (ता. १९) सकाळी वातावरणात प्रचंड उष्णता, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस सुरू झाल्यामुळे आंबा, चिकू, मिरची उत्पादकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुमारे तासभर चाललेल्या या निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा बागायतरांच्या तोंडचे पाणीच पळाले होते; मात्र तासाभरात सूर्यदर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला; परंतु दीड तासाच्या कालावधीनंतर पुन्हा अकरा वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला.

गेल्या काही दिवसांपासून बोर्डी भागातील वातावरण संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. सतत ढगाळ वातावरण राहिल्याने पिकांवर प्रचंड परिणाम झाला आहे. आंब्याची गळती होत आहे; तर मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे.

बाजारपेठेत चिकूच्या फळाला मागणी घटल्याने झाडांवरील चिकू फळे पिकून गळून जाऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत निसर्गाचे हे चक्र फिरू लागल्यामुळे बोर्डी परिसरातील शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट घोंगावत आहे.

केवळ पंचनामे

दोन महिन्यांपासून शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत मार्गक्रमण करीत आहे. होळीच्या दरम्यान झालेला अवकाळीमुळे नुकसानीचे फक्त पंचानामे झाले; मात्र नुकसान भरपाईबाबत शासनाने कुठलाही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही. अशा परिस्थितीत पुढील वाटचाल कशी करावी, या विवंचनेत शेतकरी पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT