Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात थंडी वाढण्याची शक्यता; राज्यातील अनेक भागात गारठा कायम

Winter Weather Forecast: राज्यातील किमान तापमानात घट पोषक स्थिती असल्याने थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारत आणि राज्यातील तापमानातील चढ उतार कायम आहेत. राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढत आहे. असे असले तरी थंडी सरासरीपेक्षा कमीच आहे. राज्यातील किमान तापमानात घट पोषक स्थिती असल्याने थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतात थंडीतील चढ उतार कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रवातांमुळे उत्तर भारतात थंडी कमी जास्त होत आहे. आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. वायव्य भारतात १४५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीतील चढ उतार कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील अनेक भागात थंडीमध्ये काहीशी वाढ झाली आहे. सकाळी हवेतील गारवा वाढलेला आहे. मात्र दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. आज राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली होती.

आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान वाढले आहे. मात्र उद्यापासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी आणखी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT