Cloudy Weather Agrowon
हवामान

Weather Update : रत्नागिरीत सर्वत्र ढगाळ वातावरण

Cloudy Weather : तमिळनाडूच्या फेंगल या चक्रीवादळामुळे हवामानात पूर्णपणे बदल होऊन थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण होते.

Team Agrowon

Ratnagiri News : तमिळनाडूच्या फेंगल या चक्रीवादळामुळे हवामानात पूर्णपणे बदल होऊन थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हापूसच्या मोहरासह पालवीवर कीडरोग आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गिम्हवणे येथील हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

मागील आठवड्यात पारा अगदी ११ वरून ८.८ अंश सेल्सिअसवर आला होता. संपूर्ण जिल्ह्यात हुडहुडी भरली होती. आंबा, काजू बागायतदार सुखावले होते. मोहर फुटायला सुरुवातही झाली होती. परंतु वातावरणातील बदलाने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे.

सोमवारी १३ अंश सेल्सिअन तापमान नोंद झाले आहे. त्यामुळे हवेतील उष्मा वाढला आहे. जिल्ह्यात पुढील ३ दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. बदललेल्या वातावरणात शेतकऱ्यांनी वेळीच पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे, असा संदेश कोकण कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तुडतुड्यांमुळे हापूस उत्पादनावर परीणाम होऊ शकतो. त्यासाठी बागायतदारांना कीटकनाशक फवारणीचा हात द्यावा लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Harvesting: भात कापणी करताना शेतकरी मेटाकुटीला

Traders Issue: खानदेशात तेंदू पत्ता व्यावसायिकांना मदतीची अपेक्षा

Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत ७३ हजार हेक्टरवर पेरणी

Ativrushti Madat: अतिवृष्टी, महापूर नुकसानीचे ४०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

SCROLL FOR NEXT