Monsoon Agrowon
हवामान

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: राज्याच्या बहुतांश भागात आगामी काही दिवसांत हवेच्या दाबात घट होणार असून यामुळे हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 डॉ. रामचंद्र साबळे 

डॉ. रामचंद्र साबळे

Agriculture Advisory: महाराष्ट्रावर आज (ता. २२) उत्तरेस १००२ व मध्यावर १००४ हेप्टापास्कल, तर उद्या (ता.२३) व मंगळवारी (ता. २४) १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील. त्या वेळी पावसाचे प्रमाणात वाढ होईल. मात्र बुधवार व गुरुवारी (ता. २५, २६) पुन्हा हवेचे दाब १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतके होताच पावसाची शक्यता आणि प्रमाण अल्पशा प्रमाणात कमी होईल. मात्र शुक्रवारी व शनिवारी (ता. २०, २१) पुन्हा हवेचे दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल होताच, पावसाचे प्रमाण वाढेल.

जेव्हा हवेचे दाब १००० हेप्टापास्कल इतके कमी होतील, त्या वेळी वाऱ्याचा वेग वाढून पावसाचे प्रमाण सर्वत्र वाढेल. मात्र हवेचे दाब वाढताच पावसाच्या वितरणावर परिणाम होईल. या आठवड्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. मॉन्सूनचे पुनरागमन झालेले असून मॉन्सूनने १६ जून रोजी बहुतांशी महाराष्ट्र व्यापला आहे. गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग व्यापून उत्तरेच्या दिशेने आगेकूच करीत आहे. मॉन्सून वेगाने उत्तरेच्या दिशेने क्षेत्र व्यापत आहे.

सध्या हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढगनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. तसेच प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान इक्वॅडोरजवळ २२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर पेरूजवळ १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे तिकडे हवेचे दाब वाढलेले असून हिंदी महासागरावरील वारे तिकडे जाऊ शकत नाहीत. ‘ला-निना’चा परिणाम असल्याने या वर्षी मॉन्सून सरासरीपेक्षा अधिक राहण्यासाठी हवामान अनुकूल आहे. महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी राहिल्यास उद्यापासून (ता.२३) पुढे चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल. सध्या ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, तेथेही लवकरच जोराचा पाऊस होईल.

कोकण

आज (ता.२२) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात २८ मि.मी., रायगड जिल्ह्यात २३ मि.मी. आणि ठाणे जिल्ह्यात १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस, तर पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६८ टक्के राहील. सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी (ता.२३, २४ व २७) हवेचे दाब कमी होऊन त्या दिवशी सर्वच जिल्ह्यांत पावसाच्या प्रमाणात वाढ होईल.

उत्तर महाराष्ट्र :

आज (ता.२०) धुळे व जळगाव जिल्ह्यांत २ मि.मी., नाशिक जिल्ह्यात ४ मि.मी. आणि नंदुरबार जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १६ कि.मी., तर धुळे व नाशिक जिल्ह्यांत ताशी १७ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस आणि धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ७६ टक्के, तर उर्वरित नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ८० ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के राहील.

मराठवाडा :

धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना व छत्रपती

संभाजीनगर जिल्ह्यांत आज (ता.२०) १ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २३), मंगळवारी आणि शुक्रवारी (ता. २४, २७) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०२० हेप्टापास्कल इतके कमी होत असून या दिवशी पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा वेग हिंगोली जिल्ह्यात ताशी १० कि.मी., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताशी १७ कि.मी., तर जालना व परभणी जिल्ह्यांत ताशी १८ कि.मी. राहील. धाराशिव, नांदेड व बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १९ कि.मी. राहील. लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २१ कि.मी. राहील.

वाऱ्याच्या वेगात वाढ होताच बाष्पीभवनाचा वेग वाढतो. धाराशिव, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान परभणी जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. मात्र हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ :

बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आज (ता.२२) १ मि.मी. इतक्या कमी पावसाची शक्यता राहील. उद्यापासून पावसाचे प्रमाण वाढेल. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी १७ कि.मी., तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ताशी १८ कि.मी. व वाशीम जिल्ह्यात ताशी २० कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५८ टक्के राहील.

मध्य विदर्भ ;

आज (ता.२२) यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उद्यापासून हवेचे दाब कमी होताच पावसाचे प्रमाण वाढेल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात १७ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५९ टक्के राहील.

पूर्व विदर्भ :

चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत आज (ता.२२) २ मि.मी., गोंदिया जिल्ह्यात ३ मि.मी. आणि गडचिरोली जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. उद्या (ता.२३)पासून हवेचे दाब कमी होत असल्याने पावसाचे प्रमाण वाढेल. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी., तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत ताशी १३ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६४ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

आज (ता.२२) कोल्हापूर जिल्ह्यात ११ मि.मी., तर सातारा आणि पुणे जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी पावसाची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत १ मि.मी. इतक्या कमी पावसाची शक्यता आहे. उद्यापासून हवेचे दाब कमी होत असल्याने पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली जिल्ह्यात २० कि.मी., तर सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ताशी १७ ते १८ कि.मी. राहील. पुणे व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर अहिल्यानगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.

कृषी सल्ला

- खोल जमिनीत वाफसा आल्यानंतर मूग, उडीद, मटकी, चवळी, तूर, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग या पिकांच्या पेरण्या कराव्यात.

- मध्यम, खोल जमिनीस पुरेशी ओल असताना तीळ तसेच बाजरी अधिक तूर (२ः१) पेरणी करावी.

- गोठ्यातील खड्डे मातीने भरून घ्यावेत. जेणेकरून त्या खड्ड्यात पावसाचे साचून होणारा माश्या, डास इत्यादींची कीटकांचा प्रादुर्भाव टाळला जाईल.

- पाऊस आणि थंड वाऱ्यांपासून जनावरांचे संरक्षण करावे.

- जनावरांच्या पिण्याच्या पाण्यात दूषित किंवा गाळ मिश्रण पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : पावसाने ७४४ गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Bhumi Abhilekh Portal : पोर्टलवर ८३ गावांचे दर्शन दुर्लभ

MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर

Fertilizer Buffer Stock : ‘बफर स्टॉक’मधून १३०२ टन युरिया खुला

Health Workers Issue : आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली

SCROLL FOR NEXT