Maharashtra Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात हलक्या पावसाची शक्यता; तापमानात चढ उतार शक्य

मागील चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, मुडले अगरी, मालवण तर हरनाई तसेच सातारा जिल्ह्यात सातारा, महाबळेश्वर आणि कराडमध्ये काही ठिकाणी हलक्या सरीनं हजेरी लावली.

Dhananjay Sanap

राज्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पुढील चार दिवस विदर्भ वगळता प्रामुख्याने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरीसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात चढ उतार कायम राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मागील चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, मुडले अगरी, मालवण तर हरनाई तसेच सातारा जिल्ह्यात सातारा, महाबळेश्वर आणि कराडमध्ये काही ठिकाणी हलक्या सरीनं हजेरी लावली. पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान कायम राहील. तर पुढील २४ तासात किमान तापमान मात्र २ ते ३ अंश सेल्सियसनं घसरण्याची शक्यता आहे.

मन्नारच्या आखातावर आणि शेजारील श्रीलंकेच्या किनाऱ्यावरील चक्राकार वाऱ्याची स्थिती आता कोमोरिनपासून नैऋत्य खाडीपर्यंत आहे. बंगालचा उपसागरावर समुद्रसपाटीपासून सरासरी १.५ किमी पर्यंत पसरलेला आहे. राज्यात सर्वात नीचांकी अमरेली येथे १६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर देशातील अंबिकापुर येथे नीचांकी १०.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात सह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसासोबतच ढगाळ वातावारण राहण्याची शक्यता आहे, हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mosambi Crisis: मंद ऱ्हास मोसंबीचा!

Sugarcane Welfare Corporation: ऊसतोड महामंडळाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी हालचाली

Agriculture Theft: आंबेगाव तालुक्यात दोन रोहित्रांची चोरी

MPKV Development: कृषी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविण्यासाठी जोमाने काम करू: कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Bharatbhau Bondre Death: माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचे वृद्धापकाळाने निधन

SCROLL FOR NEXT