Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : कोकण, घाटमाथा अन् पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र तीव्र झाल्याने पावसाला पोषक वातावरण होत आहे. आज (ता. ९) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र तयार झाले असून, आज (ता. ९) वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान पूरी आणि दिघा जवळ जमीनीवर येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाब पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, नर्नूल, कोटा, झांसी, कोटा, दामोह, माना पूरी ते कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. उत्तर कर्नाटक ते केरळ पर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३१ अंशाच्या पुढे आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. ९) कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT