Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023: माॅन्सूनची आगेकूच; आज कोणत्या भागांमध्ये मारली एन्ट्री?

Team Agrowon

Weather Update : जून महिनाच्या शेवटच्या आठवडा आला तरी राज्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यातच माॅन्सूनचा प्रवास धीम्या गतीने सुरु असल्यामुळं शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली.

माॅन्सूनने सोमवारी प्रगती केल्यानंतर मंगळवार आणि बुधवारी विश्रांती घेतली होती. पण आज माॅन्सूनने देशाच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती केली.

माॅन्सूनने सोमवारी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, बंगालच्या उपसागरच्या काही भाग, पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंडच्या काही भागात प्रगती केली होती. माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कर्नाटकचा रायचूर, कावली, कॅनिंग, श्रीनिकेतन, डूमका भागात कायम होती.

मंगळवारी आणि बुधवारीही माॅन्सून या भागात होता. माॅन्सूनची वाटचाल धिम्या गतीने होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण आज माॅन्सूनने काही भागात प्रगती केली.

माॅन्सूनने आज तेलंगणाच्या भागात, आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, ओडिशाचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग, पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात तसेच झारखंड आणि बिहारच्या काही भागात प्रगती केली.

महाराष्ट्रात मात्र आजही माॅन्सूनचा प्रवास थबकलेलाच होता. महाराष्ट्रात माॅन्सूनची दिशा रत्नागिरी भागातच आहे. तर देशात माॅन्सूनची दिशा रत्नागिरी, रायचूर, खम्मम, मल्कानगिरी, परलखेमुंडी, हल्दीया, बोकारो, पटना आणि रक्सौल भागात होती.

यंदा देशात माॅन्सूनचा प्रवास रखडतच सुरु आहे. माॅन्सून धीम्या गतीने पुढे सरकत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये माॅन्सून देशाचा आणखी काही भाग व्यापू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये माॅन्सून दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग, ओडिशाचा उर्वरित भाग, पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंड आणि बिहारसह छत्तीसगडचा काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रेदश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात माॅन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT