Rain Update  Agrowon
हवामान

Rain Update : आठवड्याच्या सुरुवातीस चांगल्या पावसाची शक्यता

 डॉ. रामचंद्र साबळे 

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर आज व उद्या (ता. २, ३) हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके राहतील. मंगळवारी (ता. ४) हवेचे दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी होऊन बुधवार (ता. ५)पर्यंत तसेच राहतील. गुरुवारी (ता. ६) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००० हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००२ हेप्टापास्कल इतके कमी हवेचा दाब राहील.

हवेचे दाब कमी राहतील. मंगळवार ते शुक्रवार (ता. ४ ते ७) या कालावधीत महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील, त्या वेळीच पावसाचे प्रमाण चांगले राहणे शक्य आहे.

शुक्रवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. शनिवारी (ता. ८) महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन पुन्हा ते १००६ हेप्टापास्कल इतके होतील. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढत नसल्याने बाष्पीभवनाचा वेग मंदावला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात ढगनिर्मिती होण्यास अडचण येत आहे. तसेच पावसासाठी वाऱ्याची दिशा अनुकूल होऊनही महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असल्याने पावसाचे प्रमाण सर्वसाधारणच राहील.

हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस राहण्यामुळे सध्या तरी ‘एल-निनो’चा प्रभाव राहणार नाही. राजस्थान तसेच पंजाब व हरियानाच्या पश्‍चिम भागावर अद्याप मॉन्सून पोहोचला नाही.

एकूणच या वर्षी मॉन्सूनच्या पावसाला जोर नाही. त्यामुळेच सरासरीपेक्षा पावसाचे वितरण कमी राहण्याची शक्यता आहे.

कोकण

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आज (ता. २) ५० ते ६० मिमी व उद्या (ता. ३) ८८ ते ९५ मिमी पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज (ता. २) ७७ मिमी व उद्या (ता. ३) १०० ते ११० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत १३ किमी, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत १६ ते २० मिमी राहील. कमाल तापमान रायगड व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज (ता. २) नाशिक जिल्ह्यात ६२ मिमी, तर उद्या (ता. २) ५० मिमी पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आज (ता. २) १९ ते २३ मिमी, तर उद्या (ता. ३) २३ ते २८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान धुळे जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के राहील.

मराठवाडा

आज (ता. २) लातूर, बीड व परभणी जिल्ह्यांत ३१ मिमी, तर धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २६ मिमी पावसाची शक्यता आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आज (ता. २) ८ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे.

उद्या (ता. ३) धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २० ते २६ मिमी, तर नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ९ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३ किमी, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १७ ते १८ किमी, तर धाराशिव व जालना जिल्ह्यांत २० किमी राहील.

लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी २१ ते २२ मिमी राहील. कमाल तापमान बीड व जालना जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ

आज (ता. २) बुलडाणा जिल्ह्यात २० मिमी, अकोला जिल्ह्यात १४ मिमी, वाशीम जिल्ह्यात २८ मिमी व अमरावती जिल्ह्यात १९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ३) अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत ३५ मिमी, तर वाशीम जिल्ह्यात २३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग अकोला व अमरावती जिल्ह्यांत १३ किमी, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १६ ते १९ किमी राहील. बुलडाणा, वाशीम, अमरावती व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७१ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज (ता. २) यवतमाळ जिल्ह्यात २८ मिमी, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १२ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ३) यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४ ते ६ मिमी, तर नागपूर जिल्ह्यात १२ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ किमी राहील.

सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५७ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज (ता. २) चंद्रपूर जिल्ह्यात ७ मिमी, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत १७ मिमी आणि भंडारा जिल्ह्यात २१ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ३) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३ ते ४ मिमी, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ६ ते १० किमी राहील.

कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६१ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज (ता. २) कोल्हापूर जिल्ह्यात ४७ मिमी, पुणे जिल्ह्यात ३५ मिमी, तर सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ९ ते १८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ३) कोल्हापूर जिल्ह्यात ९५ मिमी, सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत २३ ते २७ मिमी, तर नगर व सातारा जिल्ह्यांत १४ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे.

सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते २२ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८१ टक्के राहील.

कृषी सल्ला

- जमिनीत २ ते ३ फुटांपर्यंत खोलीवर ओल आल्यानंतरच पेरण्या कराव्यात.

- भात रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

- फळबाग लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT