Rain Update Agrowon
हवामान

September Rain Alert : राज्यात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस; मराठवाड्याच्या काही भागत जोर कमीच राहण्याची शक्यता: हवामान विभाग

Rain Update : . देशात सप्टेंबर महिन्यात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडेल. तर राज्यातही सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : सप्टेंबर महिन्यातही देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. देशात सप्टेंबर महिन्यात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडेल. तर राज्यातही सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. मात्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊसमान राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. 

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सप्टेंबर महिन्याचा अंदाज शनिवारी (ता.३१) जाहीर केला. देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण प्रत्यक्षात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पाऊस झाला. तर अरुणाचल प्रदेश, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिरमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरेपेक्षा कमी पाऊस झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

सप्टेंबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात चांगल्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०९ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. देशात सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. म्हणजेच एवढा पाऊस सप्टेंबर महिन्यात सरासरी पडतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या सप्टेंबर महिन्यात या सरासरीपेक्षा ९ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. 

सप्टेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅंड, मनिपूर आणि बिहार राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तसेच लडाख, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 

राजस्थानमध्ये जास्त पाऊस

सप्टेंबर महिन्यात राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे. तर पंजाब आणि हरियानाच्या काही भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्याच्या काही  भागात कमी पाऊस

सप्टेंबर महिन्यात राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकणातील सर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. त्यातही पूर्व विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस पडेल. तसेच दक्षिण मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण सरासरी राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

पहिले दोन आठवडे चांगल्या पावसाचा अंदाज

हवामान विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला. विदर्भ, कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यातही पूर्व विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर अधिक राहील. तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT