Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: राज्यात ३ दिवस पावसाची उघडीप; विदर्भात सोमवारी पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. पण जोरदार पावसाची नोंद मध्य महाराष्ट्र आणि कोकण वगळता इतर भागात झाली नाही.

हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज दिला. तर सोमवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात होईल, असाही अंदाज देण्यात आला. 

राज्यातील बहुतांशी भागात मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. आजही हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरच काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला होता.

कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

उद्यापासून पुढचे तीन दिवस मात्र राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी मात्र विदर्भात पावसाला सुरुवत होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर राज्यातील इतर भागात स्थानिक वातावरणामुळे हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT