Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Team Agrowon

Pune News : मॉन्सूनचा परतीचा पाऊस गेल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरू आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. गुरुवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, बांदा, मडूरा येथे सर्वाधिक १०७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे भात, मध्य महाराष्ट्रातील बाजरी, सोयाबीन या पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे.

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. ऊन पावसाचा लपंडाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढल्यानंतर मळणीची लगबग सुरू आहे. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे मळणीच्या कामात अडथळे येत असून शेतकरी (Farmer) चांगलेच धास्तावले आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. रायगडमधील पोलादपूर, वाकण येथे ३० मिलिमीटर, तर नंदगाव २३, श्रीवर्धन २८, बोरलीपंचटण २२ मिलिमीटर पाऊस झाला.

रत्नागिरीतील देवळे येथे ४० मिलिमीटर पाऊस (Rain) झाला. सिंधुदुर्गमधील श्रावण येथे ९३ मिलिमीटर, तर वालावल येथे ८६ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे भात पिकांचे नुकसान होत आहे.

मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील माही येथे ३३ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील आंबवडे येथे ३३ मिलिमीटर, तर इंदापूर २५, बावडा २० मिलिमीटर, सोलापुरातील करमाळा येथे ४२ मिलिमीटर, तर वैराग २०, सुर्डी २७, माढा २५, दारफळ ३६, म्हैसगाव ३१, टेंभुर्णी २१, चळे ३८ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ५० मिलिमीटर, तर शिरवळ ३५, पसरणी ३३, धोम २५,आनेवाडी, वाई २१, सांगलीतील कामेरी येथे ७७ मिलिमीटर, तर कुरळूप, पेठ ३२, इस्लामपूर ४०, चिकुर्डे ३२, शिराळा ४१, शिरशी ३४ मिलिमीटर, कोल्हापुरातील सांगरूळ येथे ३५ मिलिमीटर, तर भेडसगाव २०, आंबा २६, राधानगरी, कसबा २७, गगनबावडा २१, कसबा, निगवे २९ मिलिमीटर पाऊस झाला.

या पावसामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. मराठवाड्यातील बीडमधील हनुमंत पिंप्री येथे २१ मिलिमीटर, तर धाराशिवमधील जेवळी येथे ३३ मिलिमीटर, तर नळदुर्ग २४, माणकेश्‍वर २१ मिलिमीटर पाऊस झाला.

गुरुवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : कोकण : मंडणगड २७, म्हाप्रळ, देव्हारे २०, कडवी, मुरडव, माखजन २४, फणसवणे, तेर्हे २७, कोंडगाव, तुळसानी ३१, देवरुख २६, ओणी २२, लांजा २१, मीठबाव २६, मालवण ३२, पेंडूर २१, मसूरे ३७, आबेरी ३२, पोइप ५३, आजगाव ६७, आबोली ३३, वेंगुर्ला ६४, शिरोडा ५५, म्हापण ६२, वेतोरे ६३, कुडाळ ५७, कडावल, कसाल २३, माणगाव ३१, पिंगुळी ५०, तळवट ६३, भेडशी ४९. ( स्त्रोत - कृषी विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT