Monsoon 2025 agrowon
Video

Monsoon 2025: अपेकच्या अंदाजानुसार देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस?

दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्रानं १७ मार्च रोजी पुढील मॉन्सून हंगामात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत. मग अपेकनं आगामी मॉन्सूनबद्दल काय अंदाज वर्तवला आहे? देशात कोणत्या भागात मॉन्सून चांगला बरसणार याचीच माहिती आजच्या द अॅग्रोवन शोमधून घेणार आहोत.

Team Agrowon

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत अंदाजापूर्वी अपेकने एप्रिल ते जून दरम्यान सरासरी ते अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण गुजरातसह काही भागांत मॉन्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पावसाची कमतरता राहू शकते. जुलै ते सप्टेंबरदरम्यान तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकसह गुजरात व दक्षिण राजस्थानच्या काही भागांत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. उर्वरित देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. एप्रिलमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मे महिन्यात राजस्थान, पंजाब, हिमालयीन प्रदेश आणि बिहार-झारखंडसह काही भागांत पाऊस कमी राहू शकतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये देशातील बहुतांश भागांत सरासरी ते अधिक पाऊस अपेक्षित आहे. सप्टेंबरमध्ये मध्य भारत आणि गुजरातमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, उन्हाळा तीव्र होत असून, बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming Loss: जुन्नर तालुक्यात ४०० एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड

Farmer Training: खुटबाव येथे केळी पिकावरील शेतीशाळा

Natural Farming Council: राज्यपालांच्या उपस्थितीत पुण्यात मंगळवारी नैसर्गिक शेती परिषद

Agriculture Compensation: खरिपाचे ७६३८ कोटी तर, रब्बीचे ९६०० कोटी वितरित

Brinjal Shortage: भरीत वांग्यांच्या आवकेत घट; पिकास पावसाचा फटका

SCROLL FOR NEXT