Tomato market agrowon
Video

Tomato Market Rate: जाणून घ्या; आजचे टोमॅटो, तूर, भोपळा, बटाटा आणि लसणाचे बाजारभाव

market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण टोमॅटो, तूर, भोपळा, बटाटा आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Tomato price: टोमॅटोच्या दरातील सुधारणा स्थिरावली आहे. टोमॅटोचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहेत. टोमॅटोचे भाव राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये सध्या १५०० ते २ हजार रुपये आहेत. सरकारची हमीभावाने खरेदी बंद झाल्यानंतर तुरीचे भाव आणखी दबावात आले. त्यातच सरकारने मुक्त तूर आयातीला मुदतवाढ दिली. तुरीचे भाव सध्या हमीभावापेक्षा किमान १५०० रुपयांनी कमी आहेत. तुरीला सध्या ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील दुधी भोपळ्याची आवक मर्यादीत आहे. तर दुसरीकडे भोपळ्याला चांगला उठाव आहे. सध्या दुधी भोपळ्याला बाजारात सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले. देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ५०० ते १ हजार रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tenant Farmers: भाडेपट्ट्याने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Amaravati Water Crisis: अमरावती जिल्ह्यात लागताहेत २० टँकर

Water Scarcity: सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; एक टँकर सुरू

MIDC Project: ‘एमआयडीसी’विरोधात आरपारच्या लढाईचे संकेत

Halad Nuksan: वादळी पावसामुळे हळदीचे नुकसान

SCROLL FOR NEXT