Nanded Agriculture News: मे महिन्यातील तब्बल ४३ अंश सेल्सिअस तापमानाच्या प्रचंड उकाड्याने होरपळून निघालेल्या मुदखेड तालुक्यात गुरुवारी (ता. ७) दुपारनंतर अचानक बारडसह परिसरातील अनेक गावांना सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतात वाळवण्यासाठी अंथरलेली हळद पावसाच्या पाण्यात भिजून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे..मुदखेड तालुक्यातील बारड, नागेली, तिरकसवाडी, आंबेगाव, खैरगाव, निवघा, जवळा मुऱ्हार, जवळा फाटक, दुधनवाडी, शेंबोली, पांढरवाडी यासह अनेक गावांमध्ये गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शेतात उन्हात वाळत घातलेली हळद वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली; मात्र पावसाचा जोर एवढा होता की अनेकांना हळद सुरक्षित ठिकाणी हलवण्याची संधीच मिळाली नाही. हळदीचे नुकसान.Turmeric Cultivation: हळद लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी कशी करावी?.परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एकीकडे बाजारपेठेतील अन्यायकारक दरामुळे हळद उत्पादक आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. एनसीडेक्सवर हळदीला प्रतिक्विंटल १६ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असताना स्थानिक बाजारात मात्र व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक केवळ १२ ते १३ हजार रुपयांपर्यंतच भाव दिला जात आहे. .त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे दुहेरी संकट कोसळले आहे. हळदीच्या उत्पादनासाठी वर्षभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला असून शासनाने पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे..Turmeric Prices Drop: हळदीचे ‘पॅनिक सेंलिंग’ टाळण्याची गरज.हाता-तोंडाशी आलेली हळदीचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दराच्या बाबतीत व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असताना आता निसर्गानेही आम्हाला मारले आहे.मधुकर केशवराव देशमुख, हळद उत्पादक शेतकरी, बारड.अचानक आलेल्या पावसामुळे हळदीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच हळदीचे भाव पाडलेले असताना व्यापाऱ्यांनी पोटावर मारले आहे; तर आता अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीवरही मारले आहे.कृष्णा प्रकाशराव देशमुख, हळद उत्पादक शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.