Harbhara price agrowon
Video

Turmeric Rates: जाणून घ्या; आजचे हरभरा, पेरू, हळद, वांगी आणि कापसाचे बाजारभाव

Today market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हरभरा, पेरू, हळद, वांगी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Harbhara bhav: हरभऱ्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढ उतार सुरु आहे. सरकारने हरभरा आयातीवर केवळ १० टक्के शुल्क लागू केले. सध्या बाजारात हरभरा ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारातील वांगीची मागणी टिकून आहे. मात्र वांगीच्या आवकेत चढ उतार दिसत आहेत. सध्या वांगी २ हजार ते २ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. बाजारातील पेरुची आवक मागील ३ आठवड्यांपासून मर्यादीत दिसत आहे. सध्या पेरू ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. हळदीचे भाव मागील २ आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमुळे निर्यातीवरही परिणाम होत आहे. हळदीचे भाव मागील महीनाभरात क्विंटलमागे ५०० ते एक हजार रुपयाने कमी झाले आहेत. सध्या हळद ११ हजार ते १२ हजाराने विकली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर मागील ३ दिवसांमध्ये कापसाच्या दरातही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे वायदे ६७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशात कापूस ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: डाळिंबाचा रंग, आकार, दर्जा उत्तम राखण्यावर भर

Dhananjay Munde: कृषी खात्यात आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडे यांच्यावर १६९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Dharashiv Logistics Park: सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगावला लॉजिस्टिक पार्क

Maize Weed Management: मक्यातील वाढत्या तणाचा करा सोप्या पद्धतीने बंदोबस्त!

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला दर; फ्लॉवरला उठाव; भेंडीची आवक घटली, कारली दरावर स्थिरता, मका कणीस तेजीत!

SCROLL FOR NEXT