Soybean price update agrowon
Video

Soybean Price: जाणून घ्या; आजचे हिरवी मिरची, लसूण, बटाटा, केळी आणि सोयाबीनचे बाजारभाव

Today’s market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हिरवी मिरची, लसूण, बटाटा, केळी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Green chilli market rate: पाऊस सुरु झाल्यापासून राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक दिवसागणिक कमी होत आहे. सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. लसणाचे भाव राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. लसणाला सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपयांचा दर मिळत आहे. देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दर्जेदार केळीला सध्या चांगली मागणी आहे. केळी आवकेत  सतत घट झाली आहे. त्यामुळे २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. सध्या निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मंदीतच आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपये दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला वेग

Agriculture Department: तंत्र अधिकारी संवर्गात ठेवणे अन्यायकारक ठरेल

Talathi Bribery Case: लाचखोर तलाठ्याला सात वर्षांची सक्तमजुरी

Fruit Farming Workshop: सीताफळाचे भवितव्य ठरविण्यासाठी पुण्यात कार्यशाळा

SCROLL FOR NEXT