Tur Crop Agrowon
Video

Tur Crop: तूर पिकाच्या ओळीतील खांडण्या भरण्याचे तंत्र

Tur Production: तुरीचे पीक रोपट्याच्या प्राथमिक अवस्थेत असताना जास्त पाऊस झाला तर ओळीत पाणी साचून मूळसड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. बियाण्याला पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया केलेली नसल्यास सुद्धा बुरशीजन्य रोगामुळे बियाणे कुजतात.

Team Agrowon

Tur Farm: ट्रॅक्टरचलित किंवा बैलजोडीचलित पेरणीयंत्राणे आंतरपीक म्हणून तुरीची पेरणी केल्यास निंदणीच्या वेळी विरळणी करण हे अत्यंत गरजेच आहे. कारण ट्रॅक्टर किंवा बैलजोडीचलित पेरणी यंत्राने मूग, उडीद किंवा सोयाबीन या मुख्य पिकांमध्ये तूर पेरली असल्यास त्यांच्या दोन झाडांतील अंतरानुसार तुरीचीही दाट पेरणी होते. सोयाबीनसाठी दोन झाडांतील अंतर ५ सेंटीमीटर या प्रमाणे कॅलिब्रेट केलेल्या पेरणीयंत्राद्वारे तुरीचीही पेरणी केली जाते. खरंतर तुरीचे खोड बळकट होण्यासाठी दोन झाडांतील अंतर हे शिफारशीनुसार १५ ते २० सेंटीमीटर एवढं राखलं गेलं पाहिजे.सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीनला मुख्य पिकाचा तर तुरीला दुय्यम पिकाचा दर्जा असतो. सोयाबीन पिकाची पूर्ण वाढ होताना संपूर्ण शेत आच्छादले जाते. त्यामध्ये तुरीच्या ओळी दबून जातात. तुरीची फक्त शेंड्यांची वर – वर वाढ होते. जेवढ्या उंचीपर्यंत सोयाबीनचे पीक वाढलेलं आहे, तेवढ्या उंचीपर्यंत तुरीच्या खालील फांद्या आणि पाने पिवळी पडून वाळतात, गळतात किंवा सडतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT