rain alert agrowon
Video

Weather Update: राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

राज्यातील वादळी पावसाचे वातावरण कायम आहे. मागील ३ दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

राज्यात मागील ३ दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस काही ठिकाणी हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांसह फळपिकांचे नुकसान होत आहे. आंब्याचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेटनेडसह, सोलार पॅनेल आणि घरांचेही नुकसान होत आहे. खानदेशत केळी आणि पपई, मराठवाड्यात मोसंबी, केशर आंब्याचे नुकसान होत आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हवामान विभागाने पुढील ४ दिवस विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate: दरातील घसरणीमुळे साखर उद्योगात चिंता

Cotton Rate: कापूसदरात आशादायक उसळी

Sugar Industry Loan: आधी अहवाल द्या; नंतरच कर्ज घ्या!

Farmland Erosion Compensation: खरडून गेलेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Egg Rate: अंडीदर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

SCROLL FOR NEXT