Wheat price agrowon
Video

Moong price: मुग आणि गवारचे दर स्थिर, गहू-सोयाबीन-कापसाच्या दरात घट कायम

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण मूग, गवार, गहू, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील गवारची आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. बाजारात नव्या गव्हाची आवक सुरु झाली. देशातील अनेक राज्यांमध्ये नवा गहू विक्रीसाठी येत आहे. आज देशातील बाजरात गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते २ हजार ७०० रुपये भाव मिळाला. तर आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.१७ डाॅलरवर होते तर सोयापेंड ३०२ डाॅलरवर होते. देशात मात्र सोयाबीनची दरपातळी आजही स्थिर होती. सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली होती. प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही आजही ४ हजार ५० ते ४ हजार १५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारात सोयाबीन ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपयांनी विकले गेले. देशात कापसाचा बाजार दबावातच आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : जमीन आरोग्य जपल्यास भारतातही ब्राझीलइतकी कापूस उत्पादकता

Ragi Cultivation : नाचणी पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ नको, आमची शेतीच हवी

Solar Project : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात दहा सौर प्रकल्प

Dattatray Bharane : क्रीडा खात्याचे बरे होते, लय त्रास नव्हता; आता त्रास घ्यावाच लागेल

SCROLL FOR NEXT