Soybean export  agrowon
Video

Soybean Rate: सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान मिळावे; मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

सोयाबीन भाव वाढीसाठी सरकारने सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. राज्याच्या कृषीमूल्य आय़ोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीही ही मागणी करत सरकारने ५ हजार कोटी निर्यात अनुदान दिल्यास सोयाबीनचा भाव ५५०० रुपयांपर्यंत वाढतील, असा दावा केला. पण आता भाव वाढल्यानंतर किती शेतकऱ्यांना फायदा होणार आणि कमी भावात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांचे काय? हा प्रश्न राहतोच. आपले मुख्यमंत्रीही भावांतर योजना न राबवता आपली जबाबदारी केंद्रावर टाकत आहेत.

Team Agrowon

राज्यात सोयाबीन उत्पादन वाढले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि डीडीजीएसच्या पुरवठ्यामुळे भाव वाढले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे सोयापेंड निर्यातीसाठी अनुदानाची मागणी केली आहे. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मते, सरकारने ५ हजार कोटींचे अनुदान दिल्यास सोयाबीनचा दर ५५०० रुपयांपर्यंत पोहोचेल. मात्र, आतापर्यंत ७०% शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे, त्यामुळे अनुदान दिल्यास मोजक्या शेतकऱ्यांनाच फायदा होईल. अभ्यासकांच्या मते, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना अधिक उपयुक्त ठरू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT