kharif crops management agrowon
Video

Kharif Crop: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, ज्वारी आणि हळद व्यवस्थापन

Kharif crop management: विस्तारित हवामान अंदाजानुसार (ERFS), मराठवाड्यात १८ ते २४ जुलै २०२५ या कालावधीत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. याच काळात कमाल तापमान सरासरीइतके किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता असून, किमान तापमान सरासरीइतके राहील. तर २५ ते ३१ जुलै २०२५ या आठवड्यात पाऊस, कमाल आणि किमान तापमान सर्वच सरासरी दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा हवामानात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद आणि खरीप ज्वारी या पिकांची कशी काळजी घ्यावी, ते जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

Kharif season crop protection: सोयाबीन पीक:

पिकात अंतरमशागत करून ते तणमुक्त ठेवावे. तसेच सध्या काही भागांत सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळ्या व घाटेअळी (उंटअळी) यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कीटकांच्या नियंत्रणासाठी, पाऊस उघडल्यावर पुढीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे:

प्रोफेनोफॉस ५०% ईसी @ २० मिली

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.९०% सीएस @ ६ मिली

इंडोक्झकार्ब १५.८०% ईसी @ ७ मिली

अशा उपायांनी पिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Black Marketing: राज्यात खतांचा काळाबाजार थांबेना! ८ महिन्यांत ४४ हजार छापे, निकृष्ट दर्जावरून १,१३९ परवाने रद्द, निलंबित

Local Body Election: महापालिकेत मतदानासाठी ग्रामीण भागातील नावांची नोंदणी

Surat Chennai Highway: सोलापूर जिल्ह्यातील ५६० हेक्टरचे संपादन पूर्ण

Sugarcane Farmers: जलद ऊसतोडसाठी पैशांची मागणी

Soil Health: जमीन सुधारणेसाठी नैसर्गिक शेतीकडे वळा; डॉ. प्रशांत बोडके

SCROLL FOR NEXT