ginger market rate agrowon
Video

Jowar Market Rate: ज्वारीचे दर दबावातच; तसेच काय आहेत टोमॅटो, उडीद, आले आणि गाजराचे आजचे बाजारभाव

Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण टोमॅटो, उडीद, ज्वारी, आले आणि गाजर बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

urad dal price: बाजारातील उडदाची आवक कमीच आहे. मागणीपेक्षा सध्याची आवक कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र तरीही उडदाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. बाजारात सध्या उडीद ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयाने विकला जात आहे. ज्वारीचे उत्पादन चांगले झाल्याने दरावर दबाव असल्याचे दिसत आहे. दरपातळी २०० ते ३०० रुपयांनी कमी झाली होती. ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे. ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल २६०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. आल्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली. बाजारातील आल्याची आवकही कमी झाली आहे. आल्याला बाजारात सध्या ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. बाजारात टोमॅटोला चांगला उठाव आहे. त्यामुळे टोमॅटोचे दरही स्थिर दिसत आहेत. टोमॅटोचे भाव राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये सध्या १५०० ते २ हजार रुपये आहेत. गाजराची बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून कमी झाली आहे. सध्या बाजारात गाजर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: दानवेंच्या उमेदवारीवरून धुसफूस

Labour Insurance Issue: ‘स्मार्ट’च्या कामात कामगार इन्शुरन्समध्ये चलाखीचा संशय

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

SCROLL FOR NEXT