Milk Market Agrowon
Video

Milk Market: दुधाला ४० रुपये दर अशक्य; विखेंनी स्पष्ट सांगितले

Radhakrishna Vikhe Patil: कृती समितीनं ४० रुपये दराचा मुद्दा लावून धरला. त्यावरून मंत्री विखे आक्रमक झाले.

Team Agrowon

Farmer: पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री विखे यांनी गेल्यावर्षी ३० रुपये दर देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण खाजगी दूध संघांनी लीन सीझनमध्ये मंत्री विखे यांचे आदेश धाब्यावर बसवल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यावेळी मंत्री विखे यांनी हात वर करत कर्तव्यापासून पळ काढला. आणि खाजगी दूध संघावर राज्य सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही, असं सांगून टाकलं. त्यामुळं दूध उत्पादक प्रतिनिधि या बैठकीत रेव्हेन्यू शेअरिंग फार्म्यूल्यावर आडून होते. पण दूध संघांचा विरोधामुळं मंत्री विखे यांनी दूध उत्पादक प्रतिनिधींचा मुद्दा उडवून लावला. आणि ३० रुपये दराचं आश्वासन देऊन बैठकीचा सोपस्कार उरकून घेतला. त्यामुळं पुन्हा एकदा दूध दराचं घोंगडं भिजत पडलंय. शेजारचे राज्य दुधाला उत्पादन खर्चानुसार दर देत असताना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री विखे मात्र दूध संघांची री ओढू लागलेत, असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. विधान भवनातील बैठकीतही दूध दरावर ठोस निर्णय न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDCC Bank: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पीडीसीसी बँकेची १ कोटी २६ लाखांची मदत

Sugarcane Cultivation : नांदेड विभागात एक लाख ८१ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Flood Livestock Loss : वाहून गेलेल्या पशुधनाला बाजारभावाप्रमाणे मदत द्या

Farmer Protest: कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही; २८ ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी-मजूरांचा नागपूरात मोर्चा, बच्चू कडूंचा एल्गार

Diwali Clay Diyas : परराज्यातील पणत्यांची बाजारपेठांमध्ये आवक

SCROLL FOR NEXT