Cucumber price agrowon
Video

Cucumber price: उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला मागणी

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण बेदाणा, कांदा, काकडी, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

बेदाणा दरातील तेजी मागील दोन महिन्यांपासून टिकून दिसत आहे. नव्या बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २५० रुपये दर मिळत आहे. त्यातच देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे. बाजारातील वाढत्या आवकेमुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरु आहे. त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी १ हजार ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या १ हजार १०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युध्दामुळे सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार दिसत आहेत. मागील आठवड्यात डाॅलरची मूल्य कमी झाल्यानंतर सोयाबीनचे भाव वाढले होते. बाजारात सोयाबीन ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापूस पुन्हा एकदा ६७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचला. देशातील बाजारात कापसाची आवक ४० हजार गाठींच्या दरम्यान पोचली. तर बाजारभाव ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT