Minister Office agrowon
Video

Manikrao Kokate: पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत कृषिमंत्र्यांची घुसखोरी?

पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत पाच ते सहा खोल्या ताब्यात घेऊन त्याची तोडफोड करून तिथं राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं कार्यालय तयार करण्यात येत असल्याची बातमी अॅग्रोवननं समोर आणली. पण प्रकरण नेमकं आहे काय? याचीच सविस्तर माहिती आजच्या द अॅग्रोवन शोमधून घेणार आहोत.

Team Agrowon

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कार्यालय पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत उभारले जात आहे. या कार्यालयासाठी पाच ते सहा खोल्या ताब्यात घेऊन नूतनीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, कृषी परिषदेच्या ठरावाशिवाय हे काम सुरू केल्याने यावर वाद निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. विद्यार्थी, प्राध्यापक आणि विरोधी पक्षांनी या कार्यालयाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांचा दावा आहे की, यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडेल आणि राजकीय व्यक्तींचा वावर वाढेल. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांनी यासंबंधी कृषिमंत्र्यांची चर्चा करणार असल्याच सांगितल. कृषी भवन, साखर संकुल आणि अन्य पर्याय उपलब्ध असतानाही शताब्दी इमारतीचीच निवड का करण्यात आली, असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणाची चौकशी होणार का, आणि या कार्यालयासाठी झालेल्या खर्चाचे पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agristack Registration: छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित

Book Review: प्रादेशिक सिनेमांचा आस्वादक धांडोळा

Shades of History: इतिहासातील करडी छटा

Interview with Ashish Thackeray: बिगरजंगली बिबट्यांमुळेच संघर्ष वाढतोय

Ashtamudi Lake: एका कवितेची सत्तरी

SCROLL FOR NEXT